पुरस्कार

अति-उत्कृष्ट सेवा पदक २०२६ - श्री. संजय कुमार वर्मा, भा. पो. से. (पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ)

भारत सरकार, गृह मंत्रालय यांच्याकडून पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या दीर्घकालीन, उल्लेखनीय व निष्कलंक सेवेची दखल घेऊन मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, श्री. संजय कुमार वर्मा साहेब यांना “अति-उत्कृष्ट सेवा पदक २०२६” प्रदान करून गौरविण्यात आले आहे. ही अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे. त्यांच्या प्रदीर्घ, कर्तव्यनिष्ठ, समर्पित व निष्कलंक सेवेसाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! श्री. संजय कुमार वर्मा साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन!